क्राईमजिल्हा वार्ता

बावनबीरात अज्ञात चोरट्याने १ घरातुन १० हजार रोख लंपास तर ४ कुलूप तोडून घरात चोरीचा प्रयत्न

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीरात अज्ञात चोरट्याने १ घरातुन १० हजार रोख लंपास तर ४ कुलूपबंद घरात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना
शनिवार सकाळी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत बावनबीर अज्ञात २ चोरट्यांनी अक्षरशा धुमाकुळ घातला येथील जमीर मिर्झा यांच्या घरातुन १० हजाराची रोखड लंपास केली तर २ अज्ञात चोरट्यांनी गणेश आकोटकार , वसु साहेब, शेख शकील व शेख रहिम चुडीवाला यांच्या घरांचे कुलूप तोडले व चोरीचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनला समजताच सपोनि संदीप काळे, राहुल पवार, हे कॉ विशाल गवई, कैलास सांगळे, हे कॉ विनोद वानखडे, पो कॉ शेख इमरान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखाचे एजाज खान यांनीही घटनास्थळाची तपासणी केली. सोनाळा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला नागरिकांनी सतर्कता बाळगावी गाव परिसरात अनोळखी दिवसा रात्री फिरतांना व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ सोनाळा पोलिसांना कळवावे असे आवाहन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे व खुफिया विभागाचे विनोद शिंबरे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!