क्राईमशासकीय

काकनवाडा खुर्द येथे अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक्टरवर दंडात्मक कारवाई

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील काकनवाडा खुर्द शिवारात वान नदि पात्रातुन अवैध रेती उत्खलन करून ट्रक्टर व्दारे विना परवाना वाहतुक करतांना महसुल पथकाने पकडून दंडात्मक व जप्तीची कारवाई करून तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशान्वये सदर ट्रक्टर तामगाव पोस्टेला लावण्यात आले
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील काकनवाडा खुर्द वान नदि पात्रातुन अवैध रेती उत्खलन करून महसुल विभागाचे खबऱ्या मार्फत लोकेशन घेऊन अवैध रेती वाहतुक सुरु आहे काकनवाडा खुर्द येथील श्रीकृष्ण रामराव अढाव यांच्या मालकीचे ट्रक्टर क्र एम एच १९ सी झेड ७८८२ वाहन विना परवाना १ ब्रॉस रेती वाहतुक करतांना महसुल पथकाने पकडले व स्थळ पंचनामा करून उपरोक्त अवैध रेती वाहतुकी बाबत वाहन मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई केली तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात नायब तहसिलदार वसावे , ग्राम महसुल अधिकारी एस एस कुसळकर , एस खाटोले , एस बी कांबळे यांनी सदर दंडात्मक व जप्तीची कारवाई केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!