विशेष लेख

कृष्ण आणि सुदामा व्यक्तीरेखा नसुन सामाजिक समरसतेचे उदाहरण हभप नागेश आगलावे महाराज

संग्रामपुर [प्रतिनिधी ] कृष्ण आणि सुदामा ह्या केवळ व्यक्तिरेखा नसून सामाजिक समरसतेचे उदाहरण आहे. समाजातील एक घटक गरीब असेल आणि दुसरा श्रीमंत असेल तर या दोघांनी समन्वयातुन  एकमेकाच्या कामात यावं असं या व्यक्तिरेखांना अभिप्रेत आहे असे मत हरिभक्त परायण नागेश महाराज आगलावे यांनी तालुक्यातील उकळी बाजार येथे व्यक्त केले. भागवत कथा सप्ताह दरम्यान ते भागवताच्या माध्यमातून श्रोत्यांना संबोधित करत होते.
संग्रामपुर तालुका सह जिल्ह्याचे शेवटच्या टोकावर असलेल्या उकळी बाजार येथे प्रवचनकार हभप नागेश आगलावे महाराज कृष्ण या महाभारतातील पात्रावर आधारित भागवताच्या माध्यमातून संबोधन नागेश आगलावे करत आहेत  गेल्या आठ दिवसापासून भागवत कथा सप्ताह सुरुवात झालेली असुन. आगलावे महाराज संबोधीत करतांना म्हणाले कृष्ण हे एक जीवनरेखा महाभारतामध्ये साकारलेली आहे सर्वाधिक हाल अपेक्षा व दुःख या पात्राच्या नशिबी आलेला आहे जन्म होताच बंदीवास यानंतर जीवनाच्या प्रत्येक वयात एक एक समस्या हे ठरलेली असते असे असूनही कृष्णाच्या चेहऱ्यावर कधीच आणि कोठेच दुःख दिसत नाही माणसाने आपल्या जीवनात अशाच प्रकारे वर्तणूक ठेवली पाहिजे जीवनात कितीही दुःख असलं तरी ते चेहऱ्यावर येऊ देऊ नये मानवी मन त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीकडे आपले लक्ष आकर्षित करते ती गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित होत असते हा सिद्धांत आहे यामुळे समस्त जनतेने कोणतीही गोष्ट सकारात्मक रित्या घेऊन ती एक घटना समजून तिला सामोरे जाव. घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या जीवाला लावून घेऊ नये यामुळे आपले जीवनमान खालावते आणि जीवनातील समस्या वाढत जातात व एकदा समस्या वाढत गेल्या की ते घर कोलमडून जाते म्हणून निकोप समाज व्यवस्थेसाठी घरातील कर्त्या व्यक्तीने आपल्या अडीअडचणी व समस्या यांचा फार व न करता त्यांना अत्यंत सकारात्मक व साध्या पद्धतीने सामोरे जावे. जेणेकरून ती घटना आपल्या आयुष्यात एक दैनंदिन घटना आहे असे समजून फार मनाला लावून घेऊ नये असेही आपल्याला कृष्ण या पात्रापासून समजते.  भागवता दरम्यान आज रंगपंचमी म्हणजेच गोकुळातील होळी या प्रसंगावर महाराजांनी प्रवचन केले. होळी ही लाकडाची नसून वाईट विचारांची असावी आणि धुळवड ही रंगाची असली तरी ती आपल्या आयुष्यातील रंग वाढवण्यासाठी असावे असे त्यांनी सांगितले
राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ, जय हनुमान स्वामी विवेकानंद युवा मंडळ, उकळी बाजार यांच्या सहयोगाने उकळी गावकळी मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, श्याम देशमुख , सेवा निवृत्त मुख्याध्यापक महादेव राऊत, पातुर्डा समिती अध्यक्ष प्रकाश देशमुख , विजू वानखेडे पातुर्डा येथील समितीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख गोपाल उमाळे, गजानन करांगळे , अमीत भोंगळ , किसना सातव , कैलास करांगळे , शशांक देशमुख , डिगांबर चोपडे , उकळी बाजार पंचक्रोशीतील भावीक भक्त तथा स्थानीक नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!