वृषाली प्रकाश गावंडे यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करा ,विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून सदर प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामार्फत चालवण्यात यावे डोसे कुटुंबीयांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मांगणी

संग्रामपुर [प्रतिनिधी ] पातुर्डा येथील शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे हिचा दिनांक २ मार्च २०२६ रोजी जळगाव जामोद येथे एका पूर्वनियोजित कटाद्वारे खून करण्यात आला. सुरुवातीला हा अपघात भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तपासात हा ‘सुपारी देऊन केलेला थंड रक्ताचा खून असल्याचे निष्पन्न झाले आहे पूर्वनियोजित कट मुख्य आरोपी प्रकाश अनंता गावंडे (पती) याने अन्य साथीदारांच्या मदतीने 8 लाख रुपयांची सुपारी देऊन (पोलिसांच्या सांगण्यावरून) हा गुन्हा जागतिक महिला दिन उघडकीस आला यापूर्वीही तामगाव पोलीस ठाण्यात (FIR No. 0049/2020) कौटुंबिक छळ व प्राण घातक हल्ले यामुळे 498A पण (गावंडे परिवार) आरोपीवर पाच वर्षे पूर्वीच आहेत संशयित आरोपीचा सहभाग या कटात केवळ अटक केलेले तीन आरोपी नसून, सासरच्या इतर मंडळींचा आणि आर्थिक रसद पुरवणाऱ्या पडद्यामागच्या सूत्रधार आहे व रक्कमही 50 लाखाच्या घरात असू शकते अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे हुंडाबळीचा हा प्रकार केवळ वैयक्तिक वादातून नसून, दीर्घकाळ चाललेला छळ आणि हुंड्याशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तसेच मुलगा हा व्यभिचारी आहे अनेक स्त्रियांची संबंध प्रस्थापित केले असल्याचा आरोप मृतक शिक्षिकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे ज्यामुळे याला हिंसक वळण मिळाले.
आरोपीची आर्थिक स्थिती प्रबळ असल्याने स्थानिक तपासावर दबाव येण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पीएम अधिकारी बदलून डॉ गावंडे यांनी पीएम करणे तसेच रिपोर्टही चुलत काका गावंडे यांनी दिला त्यामुळे मुलीकडील लोकांचा रिपोर्ट पोलिसांनी घेतला नाही हा आमच्यावर अन्याय आहे परत एवढी दिशाभूल रडण्याचा खोटा बनाव करून दहनाचा कार्यक्रम सुद्धा घाईघाईने केला तसेच ताबडतोब सावडण्याचा कार्यक्रम आम्हाला न सांगताच केला बरीच घटना संशयस्पद असल्यामुळे सदर घटनेचा शोध घेतला त्यामध्ये मारेकऱ्याचे पुरावे मिळाले तसेच पूर्ण लोकेशन लक्षात आले नंतर हे पुरावे आम्ही पोलिसांना दिले व सांगितले त्यामुळे सुपारी घेऊन हे कांड घडून आणणारा आरोपी हा गजाआड झाला असे सुपारी किलर शेगाव सारख्या संत नगरीमध्ये असणे हे चिंताजनक बाब आहे कारण या काही बनावट अपघात रक्ता संबंधांमधील पाच घटना गेल्या एका वर्षामध्ये घडले आहे त्यामुळे सखोल चौकशी होणे महत्त्वपूर्ण सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास Central Bureau of Investigation (CBI) कडे वर्ग करण्यात यावा. २. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीना फाशीची शिक्षा होण्यासाठी या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून कटात सामील असलेल्या इतर पडद्यामागच्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.एका निष्पाप शिक्षिकेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण या प्रकरणात वैयक्तिक जातीने लक्ष घालून संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मांगणी मृतक पिडीत शिक्षिकेच्या नातेवाईकां यांच्या सह तालुका सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी , माजी आरोग्यमंत्री राष्ट्रवादी नेते आ डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते ॲड प्रसेन्नजीत पाटील , माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , नरेश शेळके , सह सरपंच संघटनेचे पदाधिकारी , राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते



