क्रीडामहाराष्ट्र

आट्या पाट्या खेळात महाराष्ट्र संघाचा राष्ट्रीय स्तरावर सुवर्णविजय दोन्ही गटांत अजिंक्यपद महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे दि.२ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित ३३ वी मुले व २६ वी मुलींची सब-ज्युनियर राष्ट्रीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा – २०२६ मध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही संघांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली आहे
या सुवर्णविजयी मोहिमेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे नेतृत्व करण्याचा मान पळशी झाशी येथील सामाजीक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे यांचा मुलगा विश्वजित अभयसिंह मारोडे याला मिळाला.सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोहम सुधाकर ढोकने,विरेन विनोद मोहे,विश्वजित अभयसिंह मारोडे आणि सोहम दीपक इंगळे हे चार खेळाडू होते. त्याने कर्णधार म्हणून केलेले नेतृत्व आणि संपूर्ण संघाने दाखवलेली जिद्द, शिस्त, संघभावना व खेळाप्रती असलेली निष्ठा यांचा हा अभिमानास्पद क्षण आहे.हा विजय केवळ सुवर्णपदकाचा नाही, तर कठोर परिश्रमांचा, सातत्यपूर्ण सरावाचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रत्येक खेळाडूच्या जिद्दीचा विजय आहे. या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा तिरंगा अभिमानाने फडकवत राज्याची मान उंचावली आहे महाराष्ट्राच्या दोन्ही सुवर्णविजयी संघांतील सर्व खेळाडू, मार्गदर्शक प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि या यशासाठी योगदान देणाऱ्या विश्वजित आणि त्याच्या संपूर्ण चॅम्पियन संघाला भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचा व देशाचा नावलौकिक वाढो म्हणुन सर्व स्तरावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!