आरोग्य

उदयनगर येथे भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

उदयनगर, दि. २५ मार्च — ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र उदयनगर येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी श्री. दिगंबर राऊत, श्री. संजय महाले, श्री. संतोष पाटील, श्री. भीमराव अंभोरे, श्री. परूषोत्तम अवचार, श्री. अमोल साठे, श्री. सतीश पाटील आदी उपस्थित होते.
या शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश कणखर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली. यामध्ये डॉ. प्रशांत चिंचोले, डॉ. धनंजय परिहार, डॉ. दीपक भगत, डॉ. वैभव शिंदे, डॉ. धनंजय पडघाण, डॉ. आकांक्षा आरसोडे, डॉ. वैशाली काळे, डॉ. नेहा चिंचोले, डॉ. कैलास गवई, डॉ. सतीश क्षीरसागर, डॉ. प्रियंका जाधव, डॉ. वनिता रिढे, डॉ. नीता चव्हाण, डॉ. विनोद, डॉ. अनिरुद्ध सदार, डॉ. स्नेहल ठाकरे, डॉ. विकास पाटील, डॉ. वेंकटेश, डॉ. तेजस येवले, डॉ. दिपाली हिवाळे आदींचा समावेश होता.शिबिरात एकूण ४१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अस्थिरुग्ण २६, ईसीजी २६, गरोदर माता तपासणी ३६, बालरोग तपासणी १८, सिकल सेल तपासणी २५, नेत्ररोग तपासणी ६०, एनसीडी तपासणी ९७, साधारण रुग्ण तपासणी ९९ तसेच लॅब तपासण्या २८ करण्यात आल्या. याशिवाय मोतीबिंदू ऑपरेशनसाठी १७ रुग्णांची नोंद करण्यात आली.
तसेच, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी १४ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उदयनगर, आमडापूर व मंगरुळ नवघरे येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!