औषधी दुकाने बंदच्या दिवशी आरोग्य विभागाने तत्पर राहावे नागरिकांची मागणी
औषधी दुकाने बंदच्या दिवशी आरोग्य विभागाने तत्पर राहावे नागरिकांची मागणी
संग्रामपूर [प्रतिनिधी ] ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे संग्रामपूर तालुक्यातील सर्व खाजगी औषधी दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची ससेहोलपट होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने तत्पर राहावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.बंदच्या दिवशी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. 24 तास ओपीडी व आपत्कालीन सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडता कामा नये. 108 व 102 क्रमांकाच्या सर्व अँब्युलन्स तत्पर ठेवाव्यात. एकही डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गैरहजर राहता कामा नये. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बंद काळात मुख्यालयी थांबण्याचे सक्त आदेश काढावेत, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने संग्रामपूर तालुक्याचा आढावा घेऊन यंत्रणा अलर्ट मोडवर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.संग्रामपूर, वरवट, पातूर्डा, सोनाळा, टुनकी, वानखेड या भागातील सर्व मेडिकल दुकाने 20 मे रोजी बंद राहतील. सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयावर केमिस्ट बांधवांची रॅली निघणार आहे.नियमित औषधे 19 मे पर्यंत घेऊन ठेवावीत. 20 मे रोजी फक्त आपत्कालीन परिस्थितीतच शासकीय दवाखान्यात जावे
बंदच्या काळात रुग्णसेवेत हलगर्जीपणा चालणार नाही असा ईशारा संग्रामपुर तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी दिला त्यामुळे आरोग्य विभागाने सर्तक राहणे गरजेचे आहे
. 👉बॉक्स👈
ऑनलाइन माध्यमातून प्रतिबंधित औषधे मिळणे युवा पिढीसाठी धोकादायक सदर प्रकार बंद व्हावा म्हणुन देश व्यापी बंद
ऑनलाइन माध्यमातून प्रतिबंधित औषधे नशेच्या गोळ्या व सिरपची खुलेआम सर्रास विक्री सुरू आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे मिळत असल्याने युवा पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकाच प्रिस्क्रिप्शनचा वारंवार वापर करून औषधे मागवली जात आहेत. हा प्रकार तात्काळ थांबवावा, हीच बंदमागची मुख्य उद्देश व भावना आहे.



