क्राईमजिल्हा वार्ता

अवैध रेतीचे वाहतुक करतांना पकडलेले ट्रक्टर पळविले तामगाव पोलीसात गुन्हा दाखल

अवैध रेतीचे वाहतुक करतांना पकडलेले ट्रक्टर पळविले तामगाव पोलीसात गुन्हा दाखल

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील टाकळी पंच ते अवार रसत्यावर अवैध रेतीचे विना परवान वाहन क्र ट्रैकटर MH30 AB7444 वाहतुक करतांना रात्री गस्त करतांना नायब तहसिलदार विकास शिंदे ,ग्राम मंडळ अधिकारी अविनाश खरे, संतोष खरोते सह महसुल कर्मचारी यांनी सदर ट्रक्टर थांबवुन रेती वाहतुक परवाना बाबत ट्रक्टर चालक कडे चौकशी केली असता वाहतुक परवाना मिळून आला नाही संबंधीत ट्रक्टर तामगाव पोलीस स्टेशन जमा करण्यासाठी नेत असतांना ट्रक्टर पातुर्डा गाव ते फाटा विद्युत वितरण गावठाण कार्यालया जवळ बंद पडले वाहन चालकास ट्रक्टरला टोचन करुन नेण्यासाठी सांगीतले रितेश ठाकरे रा तेल्हारा हो म्हटले. परंतु त्यांनी खुप रात्री उशीरा सदर ट्रक्टर पळवुन नेले अशी लेखी फिर्याद महसुल कर्मचारी संतोष खरोते यांनी तामगाव पोस्टेला दिल्यावरुन ट्रक्टर मालक रितेश ठाकरे रा तेल्हारा याच्या विरुध्द भारतीय न्याय सहिता (बीएनएस ) कलम ३०३(२) , २२१ , खाण खनिज अधिनियम २१(२ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास प्रमोद मुळे करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!