अभ्यासीका ही काळाची गरज ! प्रा डॉ शत्रुघ्न जाधव संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीयाचा स्तुत्य उपक्रम

अभ्यासीका ही काळाची गरज ! प्रा डॉ शत्रुघ्न जाधव
संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व व्हाइस ऑफ मिडीया चा स्तुत्य उपक्रम
संग्रामपुर [प्रतिनिधी ] शाहू महाराज फार दूरदृष्टीचे लोक कल्याणकारी राजे होऊन गेले म्हणूनच सामाजिक समता दिन हा त्यांच्या जन्म दिवशी साजरा केल्या जातो . याच दिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचा लाभ या परिसरातील विद्यार्थ्यांना होईल व यातून गरजु विद्यार्थी व अभ्यासकांची जडणघडण होऊन त्यांना आयुष्याची दिशा मिळेल असा विश्वास साहित्यिक प्राचार्य डॉ . शत्रुघ्न जाधव यांनी आज वर वट बकाल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला . यावेळी डीवायएसपी पंडितराव सोनवणे तहसीलदार प्रशांत पाटील निर्मल ग्राम च्या सरपंच सुवर्णा टापरे प्रतिभा इंगळे संचालिका पुष्पाताई भोजने इत्यादींची प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थिती होती . संग्रामपुर तालुका पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडीया यांच्या संयुक्त विद्यमाने वर वट बकाल येथे क्रांतीज्योती अभ्यासिका सुरू करण्यात आली . या अभ्यासिकेचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते करण्यात आला . दिप प्रज्वलन व अभ्यासिकेचे रीतसर उद्घाटन केल्यावर या अभ्यासिकेचे प्रवर्तक भाऊ भोजने यांनी प्रास्ताविक भाषणात या उपक्रमाचा उद्देश सांगून ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे यासाठी अभ्यासिकेसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. डीवायएसपी पदी पदोन्नती झालेले तामगाव पो स्टे .चे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी सातपुड्याचे पायथ्याशी असलेल्या या दुर्लक्षित तालुक्यात गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची गरज आज पूर्ण झाल्याचे सांगितले . तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुका पत्रकार संघाचा हा प्रशंसनीय उपक्रम असल्याचे सांगून यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले . मराठा सेवा संघाचे राज्य प्रवक्ते अभय सिंह मारोडे ज्येष्ठ पत्रकार शेषराव डाखोडे अभ्यासिकेच्या संचालिका पुष्पाताई भोजने इत्यादींनी मनोगत व्यक्त करताना अशा अभ्यासिकेची गरज या परिसरात असल्याचे सांगितले . यावेळी वृद्ध व ज्येष्ठ पत्रकार मीर मुजफ्फर अली मामा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . सिद्धांत मिलिंद सोनवणे याची वर्ग दोन च्या अधिकारी पदी नियुक्ती व ग्राम स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निर्मल ग्राम पिप्री काथरगाव च्या सरपंच सुवर्णा गणेश टापरे व वरवट बकाल च्या सरपंच प्रतिभा इंगळे यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दातार व्हाइस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष मीर मकसुद अली पत्रकार काशीनाथ मानकर , प्रल्हाद सावतकार , सुचित धनभर , नारायण सावतकार , शेषराव डाखोळे ,साबीर खान , मतीन शेख , यांचे सह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते . संचलन शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद सोनोने यांनी केले तर प्रा डाबरे यांनी आभार मानले

