जिल्हा वार्ताराजकीय

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अमोल व्यवहारे यांच्या नेतृत्वात शेतकरी विद्यार्थी सह विविध मांगण्याचे राज्यपालांना निवेदन

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शेतकरी विद्यार्थी सह विविध मांगण्याचे राज्यपालांना निवेदन

संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्वसमावेशक कर्जमाफी व सन २०२२ पासून प्रलंबित प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तातडीने द्या दुष्काळ जाहीर करावा दुष्काळ ग्रस्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शैक्षणीक फि माफ करा अश्या विविध मांगण्याचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अमोल व्यवहारे याच्या नेतृत्वात प्रशांत पाटील यांच्या मार्फत राज्यपाल याना दिले
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान व वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागविण्यासाठी विविध माध्यमातून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेली रक्कम, गोल्ड लोन, पतसंस्थांकडून घेतलेली कर्जे तसेच विविध फायनान्स कंपन्यांकडून घेतलेली कर्जे यांचा समावेश करून विशेष कर्जमाफी योजना लागू करावी. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जावरील थकीत व्याज व दंडात्मक व्याजाबाबतही शासनाने सवलत/माफी द्यावी.सातत्यपूर्ण दुष्काळ परिस्थितीचा विशेष विचार करुन निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यासाठी विशेष दुष्काळी आर्थिक मदत व शेतकरी पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे. सन २०२२ पासून प्रलंबित प्रधानमंत्री पीक विमा रक्कम तातडीने द्यावी सन २०२२ पासून प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांची तातडीने पडताळणी करून प्रलंबित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. विमा दाव्याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती देण्यात यावी.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी :
शेतकरी कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार मिळण्यासाठी पात्र कुटुंबांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी.पीक विम्याची रक्कम तातडीने मिळण्याबाबत प्रलंबित असलेला प्रधानमंत्री पीक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करावा.
संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने न्याय व आर्थिक दिलासा द्यावा दुष्काळग्रस्त भागातील सर्व वि‌द्यार्थ्यांची शाळा आणि कॉलेजची फी शासकीय व खाजगी पूर्णपणे माफ करण्यात यावी.मोफत वैद्यकीय उपचार दुष्काळ काळात आजारपण किंवा मानसिक तणावामुळे होणाऱ्या आजारांवर सरकारी व खाजगी रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करुन द्या अश्या विविध मांगणी राज्यपाल यांच्या कडे एका निवेदना व्दारे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अमोल मोतीराम व्यवहारे संदिप दामधर सह ,विशाल अजण खोड , अन्सार उर्फ पप्पु पठाण ,अक्षय जलमाकर रामदास वरपे ,महेश दुगाणे ,राजू हागे ,गौरव नागपुरे , सागर गावंडे , अमीत पाटील सह राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यकर्तेनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!