बोरखेड येथे हभप नागेश महाराज आगलावे यांच्या वाणीतुन श्रीमद् भागवत कथा वाचनास प्रारंभ

बोरखेड येथे हभप नागेश महाराज आगलावे यांच्या वाणीतुन श्रीमद् भागवत कथा वाचनास प्रारंभ
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बोरखेड येथे आज दि ३० सप्टेंबर पासुन हभप श्री.नागेश महाराज आगलावे यांचे मुदु वाणीतून श्रीमद् भागवत कथा वाचनास प्रारंभ होत आहे.सप्ताह दररोज सकाळी सहा वाजता काकडा.बारा ते तीन श्रीमद भागवत कथा, सायंकाळी सात वाजता हरिपाठ टाळ मृदंगाच्या गजरात होईल. श्रीमद् भागवत सांगता दिनी सात ऑक्टोंबर रोजी बारा काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.सायंकाळी सहा वाजता भागवत ग्रंथाची गावमिरवणूक काढण्यात येईल.या या कार्यक्रमा कार्यक्रमात गायक परमेश्वर आगलावे,तबला वादक,नितीन इंगळे.आर्गनवादक सागर कोथळकार आकटोप्याड शुभम वाघमाद, झ्याकी सुनील बुटे यांचा सहभाग लाभेल. या धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ अवश्य घेण्याचे आवाहन बोरखेड वासी आयोजकांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.



