सोनाळा येथील पत्रकार कैलास सुमंतराव खोट्टे नॅशनल आयकॉन अवॉर्डने सन्मानित

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा येथील पत्रकार कैलास सुमंतराव खोट्टे यांचे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारे पत्रकार कैलास सुमंतराव खोट्टे यांना प्रतिष्ठेचा नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शिक्षक दिन व दैनिक समीकरणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कैलास खोट्टे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पत्रकार कैलास सुमंतराव खोट्टे यांची नॅशनल आयकॉन अवॉर्डसाठी निवड करण्यात आली.समाजातील घडामोडी, जनसामान्यांचे प्रश्न तसेच सामाजिक विषयांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य कैलास खोट्टे सातत्याने करीत आहेत. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या पुरस्काराबद्दल पत्रकार कैलास सुमंतराव खोट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे



