मलकापुरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात

मलकापुर (प्रतिनिधी) दि. १०: मलकापूर शहरातील पारपेठ भागातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तीन युवकांविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजता पारपेठ परिसरात ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना सय्यद शाकेर बाहब (वय २०), इमान शिकिल्लोदिन सिद्दकी (वय २०) आणि उबेद अहमदउल्ला पठाण (वय १९, सर्व रा. माजलगाव, जि. बीड) या तिघांनी मिळून मुलीला जबरदस्तीने लाल रंगाच्या ०१ ८७३९ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये बसवून पळवून नेत असताना मोताळा नजीक बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रस्त्यावर त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने स्विफ्ट डिझायर गाडी एका शेतात घुसली पाठीमागून त्या गाडीचा मागावर असलेल्या तरुणांनी अपहरण करणाऱ्या तिघा जणांना गाडीतून काढून बेदम चोप दिला व ती स्विफ्ट डिझायर गाडी पेटवून दिली, आरोपींचा उद्देश लैंगिक अत्याचाराचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या तत्परतेने व बोराखेडी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळ मलकापूर शहर पो.स्टे हद्दीतील असल्याने तिघा आरोपींविरुध्द मलकापुर पोलिस ठाण्यात अप. क्र. ६३५/२०२५ नुसार कलम १३७(२), ३(५), ७४ बी.एन.एस. सहकलम ८, १२ पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बारे यांच्यामार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने मलकापूर शहरात तीव्र संतापाचे बातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे



