जिल्हा वार्ता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून उत्साहाने साजरा

हिंगोली प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समतादूत हिंगोलीच्या वतीने समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुटठे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 नोव्हेंबर शुक्रवार 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता बार्टी जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. भिवा रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवस्थेचे चटके सहन करून सर्वसामान्यांना शिक्षणाचे दारं खुले करून दिले. त्यांचा शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह गव्हर्नमेंट हायस्कूल येथे झाला, इथल्या व्यवस्थेन त्यांना शाळेत बसू दिलं नाही ते वर्गाच्या बाहेर बसून या देशाचे निर्माते घटनेचे शिल्पकार झाले,सातत्याने ज्ञान ग्रहण करीत,आजीवन गुणवंत विद्यार्थी म्हणून त्यांची जगात 193 देशात आजही ख्याती असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श देशाने,समाजाने घेण्याची गरज असल्याचे मत समतादूत सुरेश पठाडे यांनी बोलतांना व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला.
यावेळी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत सुरेश पठाडे, इतर मागास बहुजन कल्याणचे लेखाधिकारी – किशोर महाजन , बालाजी टेंभुर्णे,बाळासाहेब पवार ,जयदीप देशपांडे,श्रीमती उखा मुरकुटे, दीपाली इंगोले,अस्विनी डोंगरे,सचिन टाले, प्रफूल चौरे, प्रतिक सरनाईक, मारोती इंगळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधिअधिकारी ॲड, विनोद ठाकरे, संदीप घनतोडे, दीपक कांबळे, अभिजीत कांबळे, रवी कोळी, विजय अहिरेकर, सामाजिक कार्यकर्ते बबन भुक्तार, शिवाजी इंगोले आदिसह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!