आई-वडिलांची कुऱ्हाडने हत्या; नंतर मुलानेच केली आत्महत्या
चिखली तालुक्यातील आदर्शगाव सावरगाव डुकरे येथे हृदयद्रावक घटना

चिखली (प्रतिनिधी):चिखली तालुक्यातील आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे आज सकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मानसिक मानवत असणाऱ्या मुलाने दारूच्या नशेत रात्रीच्या सुमारास स्वतःच्या आई-वडिलांची कुऱ्हाडने हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेत सुभाष डीगंबर डुकरे अंदाजे वय 70 व लता सुभाष डुकरे अंदाजे वय 65 या दाम्पत्याची त्यांच्या मुलाने विशाल सुभाष डुकरे अंदाजे वय 40 याने हत्या केली. त्यानंतर
विशालनेच स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा घटस्पोट झाल्याने काही दिवसांपासून दारूच्या नशेत राहत होता. रात्री उशिरा झालेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.आज सकाळी घरात
आवाज दिले असता घरातून कोणीही प्रतिक्रिया न आल्याने संशय आल्यावर खिडकी तोडून दरवाजा उघण्यात आले ,, आतील दृश्य पाहिल्यावर तिघांचे मृतदेह पाहताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेने
सावरगाव डुकरे गावात हळहळ व्यक्त होत असून गावावर जणू दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.



