टाकळी पंच गावची लेक हिवरखेड च्या नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे यांची संग्रामपुर तालुका खरेदी विक्री संचालक संजय वाकळे यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेट वाकळे पाटील परिवारा कडून नगराध्यक्ष सुलभाताई दुतोंडे यांचा सत्कार

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील टाकळी पंच गावची लेक हिवरखेड रूपराव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुलभाताई रमेश दुतोंडे यांनी तालुक्यातील टाकळी पंच गावाला भेट देऊन चौकात डॉ बाबा साहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यांना हार अर्पण करुन अभिवादन केले त्यानंतर संग्रामपुर खरेदी विक्री संचालक संजय वाकळे यांच्या निवास्थानी हिवरखेड शहराच्या नगराध्यक्ष सुलभाताई रमेश दुतोंडे यांनी सदिच्छ भेट दिली याप्रसंगी संग्रामपुर खरेदी विक्री संचालक संजय वाकळे यांनी शाल गुलपुष्प देऊन सत्कार केला टाकळी पंच गावाची लेक नगराध्यक्ष झाल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाल बुके देऊन सत्कार स्वागत करण्यात आले यावेळी
माजी जि प सदस्य रमेश दुतोंडे टाकळी ग्रा पं उपसरपंच गोपाल वाकळे सदस्य सुरेश वानखडे , बाळू वाकळे , गजानन वानखडे ,निखिल झाडोकार , तेजराव इंगळे ,रामदास ठाकरे , यांच्या सह टाकळी पंच ग्रामस्थ उपस्थित होते



