संग्रामपुर तालुक्यात बाजार पेठ बंद सर्व पक्षीय, व्यापारी, यांच्या कडून उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

संग्रामपूर [प्रतिनिधी ] विमान दुर्घटनेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वधर्म समभाव शाहू फुले आंबेडकर विचार सरणीचे सर्व घटकात समरस होणारे बहुजन समाज बांधवांचे कैवारी सम समान न्याय देणारे ना अजीत दादा यांचा दुदैवी निधन झाले महाराष्ट्र राज्य शोक सागरात बुडाला संग्रामपुर तालुक्यात सर्व पक्षीया कडून बंदची हाक देत तालुक्यातील वरवट बकाल येथे तालुक्यातील मुख्य बाजार पेठ कडकडीत बंद पाडण्यात आला बहुजनाचे कैवारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांना तालुक्यातील सर्व धर्मिय , सर्व पक्षीय व व्यापारी यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली तालुक्यातील वरवट बकाल येथे बस थाब्या वर सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री स्व अजित दादा पवार यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या विविध स्मृतीना उजाळा देत त्यांच्या विकास कार्यावर विचार माडले छोटे मोठे दुकाने सकाळ पासून दुपार पर्यंत स्व्यंस्पूर्तीने बंद ठेऊन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीत दादा पवार यांच्या प्रतिमेला व्यापारी व सर्व धर्मिय सर्व पक्षीय नेते पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली


