दुर्गादैत्य येथील जिर्ण पाण्याची टाकी तात्काळ पाडा अन्यथा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सामाजीक कार्यकर्ते अंभोरे

दुर्गादैत्य येथील जिर्ण पाण्याची टाकी तात्काळ पाडा अन्यथा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
सामाजीक कार्यकर्ते अंभोरे
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील दुर्गादैत्य येथील अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण व धोकादायक झाली आहे सदर पाण्याची टाकी तात्काळ प्रशासनाने पाडावी अन्यथा १६ जुन रोजी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टॉईलने आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते तथागत अंभोरे यानी पं स गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि दुर्गादैत्य येथे पाण्याची टाकी जुनी व जिर्ण झाल्याने सदर टाकी धोकादायक असल्याने कोणत्याही क्षणी कोसळू शकते त्यामुळे परिसरातील नागरिकांचे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर टाकी तात्काळ पाडण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथागत अंभोरे यांनी केली आहे.


