
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिरात स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न झाले स्नेहसंमेलन दरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या नवरंग स्नेहसंमेलनात विविध नाटिका व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नर्सरी पासून ते इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, लावणी, ग्रुप डान्स, सोलो डान्स, कोळी नृत्य महाराष्ट्राच्या लोकपरंपरेवर आधारित नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे विद्यालयाच्या संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला सहकार विद्या मंदिर अध्यक्ष डॉ किशोर केला.संयोजिका डॉ स्वातीताई केला.संचालक घनश्याम राठी.कमल गांधी.माजी जि प सदस्य राजेंद्र ठाकरे पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे मिलिंद सोनोने.केंद्र प्रमुख दिनेश तायडे.सरपंच प्रतिभा विजय ईगळे.रामदास पांडव.रामदास दामधर.प्राचार्य प्रकाश भुते.मुख्याध्यापक योगेश घाटोळे.विनायक उमाळे.राजेश लोहिया यांच्या सह बुलडाणा अर्बन व सहकार विद्या मंदिर शाळेचे कर्मचारी व शिक्षण वृंद सह विद्यार्थी उपस्थित होते.



