पातुडर्यात भव्य रोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील सेवा निवृत्त मुख्यध्यापक फकिरचंदजी राठी यांच्या प्रथम स्तृतीदिना निमित्त श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका व राठी चौधरी परिवार पातुर्डा यांच्या संयुक्त विदमाने भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन दि २५ जुलै गुरुवार रोजी रक्तदान शिबीर दुपारी १ ते ३ वाजे दरम्यान तर रोगनिदान शिबीर ३ ते ६ वाजे पर्यत सरस्वती वाचनालय सभागृह बालाजी मंदिर जवळ पातुर्डा येथे करण्यात आले भव्य रोगनिदान शिबीरात जे जे हॉस्पीटचे त्वचा रोग सौदर्य तज्ञ डॉ प्रफुल वाघाडे , स्त्रिरोग वंध्यत्व निवारण तज्ञ अकोला डॉ मनिषा कासट राठी, दत्तरोग अस्थमा ॲलर्जी तथ डॉ राम देवळे, फिजीशीयन हूदयरोग मधुमेह तज्ञ डॉ धनंजय मारोडे , भव्य रोग निदान शिबीरात तज्ञ डॉक्टर तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहे पातुर्डा परिसरातील गरजु रुग्णांनी रोगनिदान व रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री रामदेव बाबा दर्शन सेवा समिती संग्रामपुर जळगाव जा तालुका व राठी चौधरी परिवाराच्या वतीने प्रसिद्ध पत्रका व्दारे केले आहे