बुलडाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त प्रगती वाचनालयात महिलांच्या जिवन संघर्षाचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन! प्रगती वाचनालयाच्या वतीने होणार संघर्षमयी कर्तबदार महिलांचा सन्मान
बुलडाणा [प्रतिनिधी ] येथील वाचनालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त प्रगती वाचनालयात महिलांच्या जिवन संघर्षाचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शासनाच्या विविध योजनेत काम करणाऱ्या तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेला छेद देऊन अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी आपली आगळीवेगळी ओळख समाजात निर्माण केली.अशा निवडक ११ महिलांच्या जिवन संघर्षाचा सन्मान वाचनालयाच्या वतीने करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्गप्रेमी शिलाताई किरण पाटील ह्या राहणार असून जिल्हा कारागृह अधिक्षक मेधाताई बाहेकर यांच्या सह प्रगती वाचनालयाचे सचिव प्रा.डॉ.कि.वा.वाघ व सीटूचे राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे
महिलांना मतांचा अधिकार मिळावा,समान कामाला समान वेतन, अमर्यादित असलेले कामाचे तास कमी करून ८ तासाची मर्यादा करणे, रात्रपाळीची ड्यूटी वर निर्बंध घालणे,आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी इत्यादी मागण्यासाठी जगभरातील महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.एकत्र येऊन वेगवेगळ्या देशांत परिषदा घेतल्या.त्याचा परिणाम म्हणून हळूहळू ह्या संपूर्ण मागण्या जागतिक स्तरावर मान्य कराव्या लागल्या.अखेर संयुक्त राष्ट्र महासंघाला ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी घोषणा करावी लागली.हा संघर्षाचा विजय आहे.आजही महिलांचा संघर्ष संपलेला नाही. अनेकदा शासकीय कार्यक्रमात पुरस्काराच्या नावाखाली बक्षीस वितरण केल्या जाते.आपण किती टक्के योजनेचे काम पुर्ण केले यावरून आपले मुल्यमापन करून आपला सत्कार केला जातो. महिला कुठल्या परिस्थितीत काम करतात?, कामाचे ठिकाण किती सुरक्षित आहे.कामाच्या ठिकाणी महिलांना किती अडचणी येतात, महिलांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती कशी आहे, याचे सरकारला काही देणं घेणं नसते.त्यांना फक्त काम महत्त्वाचं असतं.त्यामुळे शंभरातून एखाद्याचाच त्या बक्षीसासाठी नंबर लागतो. इतरांना पुढील वर्षीची वाट बघावी लागते. ह्या महिला आपला नंबर लागावा म्हणून एवढे काम करतात कि, आपल्या कुटुंबाकडे, स्वतः कडे सुद्धा लक्ष देण्यास त्यांना वेळ नसतो.याच्या उलट CITU ही आपली संघटना विचार करते कि, कामगार कर्मचाऱ्यांना कामाला पुरक अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिचा विचार केला तर सामान्यातल्या सामान्य व्यक्ती सुद्धा अतिउच्च काम करू शकतात.हीच सामाजिक जाणीव ठेवून सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन आणि प्रगती वाचनालय बुलडाणा यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनेत काम करणाऱ्या तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेला छेद देऊन अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी आपली आगळीवेगळी ओळख समाजात निर्माण केली.अशा निवडक ११ महिलांच्या जिवन संघर्षाचा सन्मान ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्यास महिलांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रगती वाचनालय व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


