कृषी
विदर्भातील सफेद मुसळी,हळद,शतावरी , शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वनऔषधी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यां सोबत सामंजस्य करार

संग्रामपुर [प्रतिनिधी ] विदर्भातील बुलडाणा जिल्हा अंतर्गत आदिवासी बहुल संग्रामपुर तालुक्यातील पळशी झाशी गावातील प्रयोग शिल शेतकरी अभयसिंह मारोडे , प्रताप गुलाबराव मारोडे यांनी सफेद मुसळी , हळद , केळी शतावरी , शेवगा ची लागवड केली वनऔषधी म्हणुन शेवगाची पाने वाळवुन तसेच अनेक आजारावर चालणारी सफेद मुसळी विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार असल्याने शेगांव येथे राष्टीय आरोग्य मेळावा मध्ये आयुष मांत्रालय अंतर्गत दिनांक 26/02/2026 ला सफेद मुसळी,हळद,शतावरी आणि शेवगा या चार पिकांचा प्रयोग शिल शेतीनिष्ट शेतकरी अभयसिंह मारोडे व प्रतापराव मारोडे दोन भावंडानी भारत सरकार या मध्यस्थीने शेगांव येथे राष्टीय आरोग्य मेळावा मध्ये आयुष मांत्रालय अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर वनऔषधी विक्री करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यां सोबत सामंजस्य करार केला.याचा फायदा विदर्भातील वनऔषधी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दृट्या कसा लाभ करून देता येईल यासाठी कायम तत्पर राहू अशी प्रतिक्रिया शेतकरी अभयसिंह मारोडे यांनी बोलतांना दिली यावेळी भारत सरकारचे केंद्रीय आयुष मंत्री स्वतंत्र प्रभार तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार ना.प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



