महाराष्ट्रशिक्षण

आर्थिक स्थिरता आणि व्यावहारिक ज्ञानासाठी पदवी महत्वाची- प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर

संग्रामपूर [ प्रतिनिधी ]  पदवी सोबतच कौशल्य व्यावहारिक ज्ञान आणि सतत शिकण्याची वृत्ती असेल तरच खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठता येते. पदवी हा आयुष्यातील एका नवीन यशस्वी पर्वाचा पाया आहे. पदवी हे केवळ एका कागदाचे प्रमाणपत्र नसून ते व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचे व अथक परिश्रमाचे आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या संधी आर्थिक स्थिरता व्यक्तिमत्व विकास आणि व्यावहारिक ज्ञानासाठी पदवी मिळवणे अत्यंत आवश्यक आहे जे करिअरला दिशा देऊन आत्मविश्वास वाढवते. आर्थिक स्थिरता आणि व्यावहारिक ज्ञानासाठी पदवी महत्वाची आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांनी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदवी वितरणाच्या समारंभात बोलतांना व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या निर्देशानुसार पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.कृष्णराव इंगळे होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ निर्देशित शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ‘पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा’ कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दि. २३ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाअध्यक्ष प्रा. भाऊसाहेब इंगळे, सातपुडा शिक्षण सस्थेच्या कोषाअध्यक्ष डॉ. स्वातीताई वाकेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर, पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे समन्वयक कला विभाग प्रमुख डॉ. सुभाष पवार, आयक्युऐसी समन्वयक डॉ. संजय टाले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. संतोष म्हसाळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सतीश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रसंत वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व शहिद दिनानिमीत्त शहिद भगत सिंग यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांच्या प्रास्ताविके नंतर समारंभात बोलताना उच्च शिक्षण घेवुन महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक जीवन जगावे, प्रत्येकाला समाजाचे काहीतरी देणे लागते पदवीधारकांनो सामाजिक बांधिलकी जपा असे मत सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाअध्यक्षा डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबत परिश्रमाची जोड आवश्यक असते असे प्रतिपादन सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.आ. कृष्णरावजी इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात केले. यावेळी सातपुडा शिक्षण संस्थेतील अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे उदाहरणे त्यांनी सांगीतली.
या पदवी वितरण सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून एकूण १७७ पदवीधरांना यावेळी पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा सोनाली तायडे यांनी केले तर आभार प्रा. नागेश इंगळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे पदवी वितरण समिती समन्वयक प्रा. डॉ. सुभाष पवार, समिती सदस्य प्रा.डॉ. सतिष राणे, प्रा. निलेश शेळके, प्रा. सोनाली तायडे यांचेसह महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!