पातुडर्यातील कृष्णाली गवईची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल ५ वीची विद्यार्थीनी कृष्णाली विनोद गवई हिने कठीण समजली जाणाऱ्या स्पर्धात्मक असलेल्या नवोदय प्रवेश परिक्षेत यश मिळविले कृष्णाली गवई ( एस सी ) कोठ्यातुन नवोदय विद्यालय कडून प्रसिध्द झालेल्या दुसऱ्या यादीत तीचे नाव समाविष्ट असल्याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश साठी पात्र ठरली तिला शेगाव येथील नवोदय विद्यालय येथे ६ व्या वर्गात प्रवेश मिळणार आहे सदर विद्यार्थीनीला राहण्यासाठी होसटेल व पुढील १२ वी पर्यत शिक्षण मोफत मिळणार आहे नवोदय प्रवेश परिक्षेसाठी आई व वडिल विनोद गवई यांनी प्रोत्साहित केले तर मुख्यध्यापक रामप्रसाद मावस्कर , वर्ग शिक्षक दिलीप दसोरे , दिनेश डाबरे, शिवलाल उभे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले
नवोदय विद्यालय प्रवेश साठी कृष्णाली गवईची निवड झाल्या बद्दल तीचे सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती सह पातुर्डा ग्रामस्थां कडून कौतुक होत आहे



