पातुडर्यात गायत्री परिवाराच्या वतीने लोकेशानंद गिरि महाराज पुण्यतिथी निमित्त सत्संग प्रवचन विविध कार्यक्रमा सह निवासी शिबीराचे आयोजन

पातुडर्यात गायत्री परिवाराच्या वतीने लोकेशानंद गिरि महाराज पुण्यतिथी निमित्त सत्संग प्रवचन विविध कार्यक्रमा सह निवासी शिबीराचे आयोजन
संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा येथे अखिल विश्व गायत्री परिवार हरिव्दार व गायत्री मंदिर माळी पंच पातुर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने माळी पंच गायत्री मंदिर प्रांगणात लोकेशानंदगिरि महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि १२मे ते १६ यादरम्यान नित्य पंच कुंडी यज्ञ जप, ध्यान दिक्षा संस्कार , सत्यंग प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन लोकेशानंदगिरी महाराज यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमा स्थळी विधिवंत पुजन करुन आदिवासी लोकनृत्या सह आदिवासी वाद्य गायत्री मंत्राचा जप करित गावातुन जन जागृती साठी शोभायात्रा काढण्यात आली दैनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन दैनदिन कार्यक्रमा अंतर्गत पहाटे जागरण , ३ :३० प्रार्थना आरती सुर्य स्तुती , सकाळी ५ ते ८ ध्यान , जप , साधना , ८ ते १० पर्यंत प्रज्ञ पेय फराळ , नित्य यज्ञ , संस्कार , त्यानंतर भोजन झाल्यानंतर दुपारी २ ते ४ पर्यंत विश्रांती , दुपारी ४ ते ५ पर्यंत जप साधना आरती, सायंकाळी अर्धातास नादयोग साधना , प्रवचन हितगुज रात्री विश्रांती गायत्री परिवाराच्या वतीने आयोजीत सत्संग प्रवचन शिबीर प्रसंगी अथरून पाघरून शिबीरार्थी यांनी दैनिक उपयोगाच्या वस्तु सह आधार कार्ड २ पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावे तसेच शिबीरा दरम्यान शिस्त नियमाचे पालन करावे शनैश्वर जयंतीला महाप्रसादाचे वितरण नंतर सदर कार्यक्रमाची सांगता होणार आहे आध्यात्मिक ज्ञान मनशांती साठी पातुर्डा परिसरातील भावीक भक्तांनी विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान गायत्री परिवाराच्या वतीने एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे



