जिल्हा वार्ताशिक्षण

रोजगार सेवकाच्या मुलीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करित दहावीत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत सुरेखा दाभाडे हिचा वंचीत बहुजन आघाडी कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र शैक्षणीक साहित्य भेट देऊन सत्कार

 

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील उच्च शिक्षित पदविधर परिस्थिती पुढे हतबल होत तुटपुंजी मानधान वर रोजगार सेवक म्हणुन सुनिल दाभाडे कार्यरत तर पत्नी शेत मजुर आई वडिल शेत मजुरीचे काम करुन आपल्या पाल्याच्या शिक्षणा सहसंसाराचा गाडा ओढत असतांना अश्या घरच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करित सुरेखा सुनिल दाभाडे हिने दहावीच्या परिक्षेत ९६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन घरच्या परिस्थितीची जाण ठेवुन उत्कृष्ट गुण संपादन आई वडिलांच्या स्वप्नपुर्ती केल्याने सुरेखावर कौतुकाचा वर्षाव होत आहे जिल्हा परिषद हायस्कुल पातुर्डा येथुन ९६ टक्के गुणांसह विशेष प्राविण्य प्राप्त केल्या बद्दल गुणवंत सुरेखा दाभाडे हिचा वंचीत बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष किशोर भिडे वंचीत युवानेते संदिप वानखडे यांनी पातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर स्थळी सभागृहात हार घालुन डॉ बाबासाहेबांचे आत्मचरित्र ग्रंथ व शैक्षणीक साहित्य भेट देऊन सत्कार करून कौतुक केले यावेळी डॉ बाबासाहेब पदस्पर्श सोहळा समिती अध्यक्ष कैलास दाभाडे , प्रा अमोल खंडेराव , नंदकिशोर पुडे , सामाजीक कार्यकर्ते मिलींद वानखडे, महादेव दाभाडे , मनोज दाभाडे , दिशेश वानखडे , सह बहुसंख्यांक बहुजन समाज उपस्थित होते .

बॉक्स
सॉफ्टयर इंजिनियर बनुन आई वडिलांचे स्पप्नपुर्ण करण्याचा निर्धार

प्रतिकुल परिस्थितीवर मात करित दहावीत ९६ % उत्कृष्ट गुणसंपादन प्राविण्यसह प्राप्त केल्याने उच्च शिक्षण सॉफ्टयर इंजिनियर बनुन आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करायचे अशी भावना सुरेखा सुनिल दाभाडे हिने व्यक्त करित कठिण परिस्थिशी सामना करण्यासाठी कठिबध्द असल्याचा निर्धारही व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!