जिल्हा वार्ता

चोंडी टाकळेश्वर येथे बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह संस्कार सोहळा संपन्न २१ जोडपे विवाह बध्द

चोंडी टाकळेश्वर येथे बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह संस्कार सोहळा संपन्न २१ जोडपे विवाह बध्द

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील जैन फॉन्डेशन निवाणा च्या वतीने चौंडी टाकळेश्वर येथे भारतीय बौद्ध महासभेचे भाऊराव गव्हांदे यांच्या पुढाकाराने समाज बांधवांच्या सहकार्याने बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह संस्कार सोहळा अत्यंत मंगलमयी, शिस्तबद्ध पद्धतीने उत्सहात पार पडला. सदर बौद्ध धम्मीय विवाह सोहळ्यात २१ जोडपे विवाह बध्द झालेत हा सोहळा समाजाला एक नवी दिशा देणारा ठरला भव्य दिव्य बौद्ध धम्मीय सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जैन फॉन्डेशन संस्थेचे अध्यक्ष राजेश्वराव देशमुख हे होते उदघाटन वंचीतचे जेष्ठनेते देविदास दामोदर यांच्या हस्ते संपन्न झाले तर व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रसेन्नजीत पाटील ,बौद्ध धम्मीय विवाह सोहळ्याचे आयोजक भिमराव गव्हांदे , प्रा सुभाष शिरसाट , गणेश पाटील , चोंडी टाकळेश्वर च्या सरपंच सखुबाई बोरसे , रवि पहुरकर , दादाराव धनधर , दादाराव दामोदर , बौध्दाचार्य मिलींद वानखडे , साहेबराव भगत , रमेश नाईक , गोपाल बंड , राहूल शिरसोले , कैलास मारोडे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी सोहळ्यादरम्यान मान्यवरांनी बौद्ध धम्मीय विवाह सोहळयाचे आयोजन बौध्द समाजाला एक नवी दिशा देणारा असल्याचे मत व्यक्त करित मान्यवरांनी भाऊराव गव्हांदे व त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले सामुहिक विवाह सोहळ्या दरम्यान आयोजकांच्या वतीने संदीप राऊत, रवि पहुरकर , नितीन बोरे यांचा सत्कार केला

👉बॉकस👈
सामाजीक कार्यकर्ते कैलास मारोडे यांच्या कडून नवदाम्पत्यास तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य प्रतिमा भेट

नेहमीच सामाजिक कार्यात तसेच जनसेवेत सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास मारोडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन त्यांच्या संकल्पनेतून नवदाम्पत्यास तथागत भगवान गौतम बुद्धांची एक भव्य देखणी फ्रेम भेट देण्यात आली यावेळी बौद्ध धम्मीय सामुहिक विवाह सोहळा आयोजक व समाज बांधवांच्या वतीने सामाजीक कार्यकर्ते कैलास मारोडे यांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!