बुलढाण्यात जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त 60 फार्मासिस्टची मोफत आरोग्य तपासणी

बुलढाण्यात जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त 60 फार्मासिस्टची मोफत आरोग्य तपासणी
बुलढाणा [प्रतिनिधी ] जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त बुलढाणा येथे आयोजित ‘स्मार्ट फार्मासिस्ट कोर्स – हायपरटेन्शन मास्टरक्लास’ मध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील 60 कम्युनिटी फार्मासिस्टची मोफत डायग्नोस्टिक रक्त तपासणी करण्यात आली.या शिबिरात ब्लड शुगर, एचबीए1सी, लिपिड प्रोफाइल, थायरॉइड टेस्ट व रक्तदाब यांसह महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीदरम्यान 3 नवीन व्यक्तींमध्ये मधुमेह आढळून आला, तर 6 फार्मासिस्टमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. थायरॉइड तपासणीचे अहवाल लवकरच थायरोकेअर लॅबकडून प्राप्त होणार आहेत.यावेळी मार्गदर्शन करताना अनिल नावंदर म्हणाले, “समाजाचे आरोग्य जपणारा फार्मासिस्ट स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याबाबतही तितकाच सजग असणे आवश्यक आहे.” डीआयसी प्रमुख गणेश बंगळे यांनी सांगितले की, फार्मासिस्ट समाजाचे आरोग्य सांभाळताना स्वतःचे आरोग्यही उत्तम राखावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे सुमारे 3 लाख रुपये किमतीच्या तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.या प्रसंगी बीडीसीडीए अध्यक्ष गजानन शिंदे, संघटन सचिव राजेश काळे, कार्यकारिणी सदस्य प्रमोद टाकळकर, अजय जैन, विजय दवंगे, चंद्रशेखर बारोटे, चंदन दरोगा, खामगाव तालुका अध्यक्ष नंदकिशोर कांडेकर, संग्रामपूर तालुका अध्यक्ष उमेश इंगळे, मलकापूर तालुका सचिव निरज चवरे, सतीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.स्वता निरोगी तर समाज निरोगी’ या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.


