ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात AIOCD आक्रमक,
देशव्यापी बंद आंदोलनाची हाक ! प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे मिळत असल्याचा AIOCD चा आरोप
बुलडाणा [प्रतिनिधी ] प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे मिळत असल्याचा आरोप करित ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात AIOCD आक्रमक देशव्यापी बंद आंदोलनाची हाक दिली आहे
बनावट औषधांचा धोका वाढला, रुग्णांच्या जीवाला धोका ऑनलाइन फार्मसी ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी ऑनलाइन औषध विक्रीला आळा घालण्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) ने आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहेप्रिस्क्रिप्शनशिवाय सहज औषधे मिळणे आणि बनावट औषधांचा वाढता पुरवठा यामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म ‘फास्ट डिलिव्हरी’ च्या नावाखाली डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी न करता अँटिबायोटिक्स, गर्भपाताची औषधे, गुंगी आणणारे औषधे, झोपेची औषधे,पेनकिलर यांसारखी औषधे थेट घरपोच देत आहेत. यामुळे औषधांचा गैरवापर वाढत असून, बनावट व कमी दर्जाच्या औषधांची विक्रीही राजरोसपणे सुरू आहे. बनावट औषधे विकली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या सर्व ऑनलाइन ॲप्सवर तातडीने बंदी घालण्यात यावी.संघटना कौशल्य विकास सारख्या कार्यक्रमातून जनजागृती करत आहे. औषधांच्या योग्य वापरावर भर दिला जात असताना, ऑनलाइन विक्रीमुळे मूळ हेतू साध्य होत नाही. समाजाला योग्य औषधी पुरवायची गरज आहे.
दरम्यान, AIOCD ने 20 मे रोजी देशभरातील सर्व केमिस्ट शॉप बंद ठेवून निषेध नोंदवण्याचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते या बंडात सहभागी होत असून बंद 100% यशस्वी होणार आहे. असे मानद सचिव अनिल नावंदर, अमरावती विभागाचे राजेंद्र नहार , जिल्हा अध्यक्ष गजानन शिंदे, सचिव राम आयलानी यांनी सांगितले आहे.


