श्री नागेश्वर महाराज विद्यालयात २६ वर्षा नंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा कायमचे सोडून गेलेल्या मित्रांना व वर्ग शिक्षकांना वाहली श्रद्धांजली


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथे श्री नागेश्वर महाराज विद्यालयात २६ वर्षा नंतर भरली शाळा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत मित्र मैत्रीनीनी एकमेकांची आस्थेने विचार पुस करुन जुन्या स्मृतीना उजाळा देत गप्पा मध्ये रमले तर शालेय जिवनात मित्र ७ व वर्ग शिक्षक ५ आज हयात नसल्याचे दु :ख व्यक्त करित ७ वर्ग मित्र व ५ वर्ग शिक्षक यांना काहि क्षणासाठी मौण धारण सामुहिक श्रध्दांजली दिली राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली श्री नागेश्वर महाराज विद्यालय येथे 26 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली श्री नागेश्वर महाराज विद्यालय येथे सन 1999 ते 2000 या बॅचचे विद्यार्थी सव्वीस वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे अनुषंगाने सर्व एकत्र येऊन पुन्हा एकदा बालपणींना उजाळा देण्यासाठी शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष आसाराम गांधी माजी उपाध्यक्ष शालीग्राम दामधर सह शिक्षक निमकर्डे , राजनकर , वानखडे ,उमाळे , आस्वार ,बकाल, पवार , डॉ अशोक भुते मुख्याध्यापक एम. एम.राजपूत वरिष्ठ लिपीक तायडे कनिष्ठ लिपीक लापूरकर, संपतराव डाबरे नरसिंगराव बकाल, कैलास जावडेकर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक विनोद दामधर यांनी केले संचालन सीमा रावणकार , तर देवानंद दमधर यांनी आभार मानले यावेळी गोपाल ढगे शेख नईम , शांताराम खाळपे लता घायल (धुळे)यांनी मनोगत व्यक्त केले सर्व वर्ग मित्रांनी शाळेला श्री संत नागेश्वर महाराजांची प्रतिमा सप्रेम दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश गोल्हार ,विकास लवाटे , शिवहरी भुसारी ,भानुदास रावणकर, मिलिंद गव्हांदे ,गोपाल ढगे, शिवहरी रावणकार, दिलीप घायल , सचिन बोरोकार ,विजय टाकळकार, राजेश माळी ,श्रीकृष्ण डाबरे ,विलास बोडखे, शेख कारिस , देवानंद दामधर अनिल ढगे, बळीराम ढगे निलेश वेलकर , शेख नईम ,श्रीकृष्ण डाबरे , विलास बोडखे ,गजानन अस्वार ,योगेश गवांदे ‘ प्रशांत मारोडे , सह आदींनी प्रयत्न केले


