पातुर्डा ब्रह्मा कुमारीच्या वतीने तीन दिवसीय बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न मुलांमध्ये मूल्यांची जागृती करण्याचा दिला संदेश.

पातुर्डा ब्रह्मा कुमारीच्या वतीने तीन दिवसीय बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न
मुलांमध्ये मूल्यांची जागृती करण्याचा दिला संदेश.
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यात पातुर्डा ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर पातुर्डा सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. छाया दिदि यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न झाले. मुलांना राजयोग, ध्यान, नैतिक शिक्षण, सकारात्मक विचार आणि चांगल्या मूल्यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले या शिबिर पातुर्डा सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. छाया दिदि यांनी आयोजित केले होते. छाया दीदीजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली, शिबिरादरम्यान मुलांसाठी गाणी, खेळ, योगाभ्यास, चित्रकला, भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी सर्व उपक्रमांमध्ये आनंद आणि उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी भगिनी आणि शिक्षकांनी मुलांना शिस्त, आदर, स्वच्छता आणि चांगल्या चारित्र्याचे महत्त्व समजावून सांगितले. विशेष शिबिरात, माजी शिक्षण अधिकारी, गोमासे जळगाव जामोद उज्ज्वला, कांचन सदाफडे, बी. के. शीतल दीदी यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले. मुलांना दिव्य भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.



