जिल्हा वार्ताशिक्षण

प्रा. प्रफुल खंडारे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी जाहीर

​प्रा. प्रफुल खंडारे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी जाहीर

बुलडाणा [प्रतिनिधी ] संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून नुकतीच आचार्य (Ph.D.) पदवीची अधिसूचना(नोटिफिकेशन) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रा. प्रफुल भगवान खंडारे यांना वाणिज्य आणिव्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य विषयात आचार्य (Ph.D.) पदवी जाहीर झाली आहे. प्रा. प्रफुल खंडारे यांनी “Demonitesation An Analytical Study, It’s causes and Consequences with special reference to Amravati Region 2009-2019” (अमरावती विभागाच्या विशेष संदर्भासह नोटबंदी: एक विश्लेषणात्मक अभ्यास, त्याची कारणे आणि परिणाम २००९-२०१९) या विषयावर आपला शोधप्रबंध (Thesis) सादर केला होता. खामगाव येथील नामांकित ‘गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय’ वाणिज्य संशोधन केंद्रातून, मार्गदर्शक डॉ. आनंद भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी हा शोधप्रबंध पूर्ण केला आहे. डॉ. आनंद भोसले यांच्या मार्गदर्शनात Ph. D करणारे प्रफुल खंडारे हे सातवे विद्यार्थी ठरले आहेत.​प्रा. प्रफुल खंडारे यांचे वाणिज्य शाखेतील संपूर्ण शिक्षण खामगाव येथील गो. से. महाविद्यालयातूनच पूर्ण झाले आहे. त्यांनी यापूर्वी वाणिज्य विषयात SET (सेट) आणि NET (नेट) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ​पत्रकारिता(Journalism) विषयातही त्यांनी NET (नेट) परीक्षा यशस्वीरी्या उत्तीर्ण केली आहे. ​यासोबतच त्यांनी कायद्याची पदवी (LL.B.) देखील संपादन केली आहे.आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रा. प्रफुल खंडारे यांनी याचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक डॉ. आनंद भोसले, गो. से. महाविद्यालय संशोधन केंद्र तसेच आपल्या माता-पित्यांना दिले आहे. ​पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात एकाच वेळी उत्तम ठसा उमटवणाऱ्या प्रा. खंडारे यांच्या या यशाबद्दल त्यांचे पत्रकार मित्र, शैक्षणिक क्षेत्र, गो. से. महाविद्यालय परिवार, एस पी एम महाविद्यालय नांदुरा परिवार आणि बुलढाणा जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!