संविधान संरक्षण समितीच्या वतीने ६ जुलै रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा

संविधान संरक्षण समितीच्या वतीने ६ जुलै रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा
संग्रामपुर [प्रतिनिधी ] संविधान संरक्षण समिती संग्रामपूर च्या वतीने वरवट बकाल येथील जेतवन बुद्ध विहार मध्ये संविधान संरक्षण समितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण” या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.शासनाने घेतलेला अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात शासनाने घेतलेला अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी संविधान संरक्षण समिती संग्रामपूर यांच्या वतीने संविधान प्रेमी समाज बांधवांच संग्रामपूर तहसील कार्यालयावर दि. ६ जुलै रोजी विराट महामोर्चा निघणार असल्याचे जाहिर करण्यात आले .यावेळी बैठकीत संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी व संविधान प्रेमी समाज बांधव उपस्थित होते.


