जिल्हा वार्ताशिक्षण

अकोली बु. शाळेच्या नूतनीकरणाचे अनावरण सामाजिक बांधिलकी जपणारे शंकर पुरोहित यांच्या पत्नी निशा पुरोहित यांच्या हस्ते १२ गरजु होतकरु विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रू धनादेश शिष्यवृत्ती वाटप

अकोली बु. शाळेच्या नूतनीकरणाचे अनावरण
सामाजिक बांधिलकी जपणारे शंकर पुरोहित यांच्या पत्नी निशा पुरोहित यांच्या हस्ते १२ गरजु होतकरु विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रू धनादेश शिष्यवृत्ती वाटप

संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यातील अकोली बु जि प मराठी शाळेचे ग्रामसक्षम प्रकल्पांतर्गत अंतर्गत बालस्नेही परिषद शाळेच्या खिडक्या, नवीन फॅन, एलईडी लाईट, आकर्षक पेंटिंग सुविधा युक्त सह ३ खोल्याचे नूतनीकरण अनावरण सामाजिक बांधिलकी जपणारे शंकर पुरोहित यांच्या पत्नी निशा पुरोहित यांच्या हस्ते करुन गरजू, होतकरू व गुणवंत १२विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये धनादेश प्रमाणपत्र शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले निशा शंकर पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामसक्षम प्रकल्पांतर्गत अंतर्गत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची उभारणी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर सुविधा प्लॅटफॉर्मची निर्मिति बालस्नेही संकल्पनेतुन रंग रंगोटी शुशोभिकरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला विकास सहयोग प्रतिष्ठानचे संचालक राहूल खडसे निशा शंकर पुरोहित यांच्या सह अकोली बु सरपंच साळुंके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक बांगर , सहाय्यक शिक्षक मनोज सावरकर, उमेश अरबट, प्रवीण कंडारकर,SBI फाउंडेशन व विकास सहयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते या कामामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ, प्रेरणादायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध झाले आहे. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, पुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक
गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश देत शिष्यवृत्तीचा योग्य उपयोग करून उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. यावेळी अकोली बु येथील प्रतिष्ठीत नागरिक ,बचत गटातील महिला, पालक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी SBI फाउंडेशन व विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. SBI ग्रामसक्षम प्रकल्पांतर्गत शिक्षण, सामाजिक विकास व उपजीविका वृद्धीशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन प्रोजेक्ट मॅनेजर संदीप धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लाईव्हस्टॉक ऑफिसर. शोभा हिवरकर तसेच गावपातळीवरील पशुसखी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!