जिल्हा वार्ताशिक्षण

पळशी झाशी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

पळशी झाशी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, याच बरोबर पळशी झाशी ग्रा पं नेही ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात’ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे गावाच्या शैक्षणिक व विकासात्मक कार्याचा विशेष गौरव होत आहे. या जि प शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावर्षी इयत्ता पहिलीत २५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यावर मानाचा फेटा बांधून इयत्ता पहिलीत २५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या एकूण १७० विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून, वाजत-गाजत स्वागत करण्यात तर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात स्वागत करण्यात आले. प्राचार्य थोटांगे , विजय मारोडे, विजय ठाकरे व मोहन वानखडे यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना वही व पुस्तकांचे वाटप केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला संग्रामपूर तालुक्याचे गटविकास अधिकारी माधव पायघन, गुलाब बाबा विद्यालयाचे प्राचार्य थोटांगे, पळशी झाशी ग्रा पं च्या सरपंच प्रियंका राहुल मेटांगे, ग्रा पं सदस्य अभयसिंह मारोडे, संगीता चितोडे, सुरेश हेलगे, अमोल दामले, पोलीस पाटील संतोष निकाळजे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता गिरी, उपाध्यक्षा मुक्ता चितोडे, मोहन वानखडे, विजय मारोडे, विजय ठाकरे, विनायक रहाटे, गजानन वाघ, गजानन बाजोडे, रामदास कुयटे, बळवंत ठाकरे, सुधाकर शिरसोले, डॉ. सुरेश मारोडे, विष्णू राठी, हरिदास मारोडे, विजय चरखे, अशोक भिवटे, गोपाल दोरकर, निळकंठ मारोडे, राहुल साबे, अनिल शिरसोले, सुजित बांगर, मुख्याध्यापिका डाबेराव मॅडम, शिक्षक मिलिंद सोनोने, वावगे , तांबडे , डायलकर मॅडम, देशमुख,निकाळजे ताई, अंगणवाडी सेविका ज्योती आमले, बेबी खुमकर, मंगला करांगडे, कल्पना चितोडे, पूजा मारोडे, उज्वला बांगर, अनिता बनतकार तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वावगे यांनी केले, तर आभार राहुल मेटांगे यांनी मानले.

👇
पळशी झाशी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांप्रती दाखवत असलेला आदर, जिव्हाळा आणि सहभाग कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते आणि गावातील एकोप्याचे प्रेरणादायी दर्शन घडते
माधव पायघन
गटविकास अधिकारी

👇

गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणे शक्य झाले असून हे यश संपूर्ण गावाचे आहे
सरपंच प्रियंका राहुल मेटांगे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!