महाराष्ट्र

एसआयआर प्रक्रिया मध्ये नावसोबतच मतदान ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) हा मॅपिंगचा मुख्य आधार असावा सेवानिवृत्त शिक्षक पठाण यांची राज्य व मुख्य निवडणूक आयोगकडे मागणी

एसआयआर प्रक्रिया मध्ये नावसोबतच मतदान ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) हा मॅपिंगचा मुख्य आधार असावा सेवानिवृत्त शिक्षक पठाण यांची राज्य व मुख्य निवडणूक आयोगकडे मागणी

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्रत प्रक्रिया सुरू झाल्यामुळे वेळेवर हे शक्य नसेल तरी किमान ज्या नागरिकांचे मिसमॅच मध्ये येत आहे त्यासाठी तरी ही प्रक्रिया अमलात यावी.
एसआयआर प्रक्रिया मध्ये मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेदरम्यान अनेक नागरिकांची नावे सन २००२ च्या मतदार यादीशी जुळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील टूनकी बु. येथील सेवानिवृत्त शिक्षक अताउल्ला खा रफिक खा पठाण यांनी राज्य निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगकडे इमेल द्वारे निवेदन सादर करून नावाऐवजी मतदान ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) हा मॅपिंगचा मुख्य आधार मानण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २००२ च्या मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांच्या नावांमध्ये स्पेलिंग, आडनाव किंवा इतर तपशीलांबाबत त्रुटी होत्या. कालांतराने अनेक नागरिकांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या चुका दुरुस्त केल्या आहेत. मात्र, सध्याच्या मॅपिंग प्रक्रियेत जुनी व नवीन नावे जुळवून पाहिली जात असल्याने अनेक वैध मतदारांचे रेकॉर्ड ‘मिसमॅच’ म्हणून दर्शविले जात आहेत.2002 च्या यादीत नाव जुळत नसेल तर आई वडील,आजी आजोबा ह्यांच्या नावाचा मॅपिंग मध्ये पर्याय आहे पण ते सुद्धा बऱ्याच प्रमानात चुकीचे आहे.
शिक्षक पठाण यांनी सुचविले आहे की, नाव मॅपिंग सोबतच मतदाराच्या EPIC क्रमांकाच्या आधारे पडताळणी व मॅपिंग करण्यात आल्यास प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद होईल. नावातील बदल किंवा दुरुस्तीमुळे निर्माण होणारा गोंधळ टाळता येईल तसेच पात्र मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही.जुना आणि नवीन नंबर लिंक असणे: जरी नावाच्या दुरुस्तीनंतर मतदाराचा नवीन कार्ड नंबर वेगळा वाटत असला, तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या प्रणालीत मतदार कार्ड दुरुस्त करताना त्या नवीन कार्डावर/डेटाबेसमध्ये जुन्या कार्डाचा संदर्भ आणि नंबर जोडलेला असतो  राज्य निवडणूक आयोगाने
नावातील बदलांमुळे उद्भवणारा गोंधळ टाळण्यासाठी आणि डेटा मॅपिंग १००% अचूक करण्यासाठी, सॉफ्टवेअर किंवा पडताळणी प्रक्रियेत नाव मॅपिंग सोबतच ‘EPIC नंबर मॅपिंग’ या पर्यायाला प्राधान्य देण्यात यावे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि नागरिकांची नाहक गैरसोय टळेल.कमीतकमी ज्या नागरिकांच्या नावाचे मिसमॅच दाखवत आहे त्यांच्यासाठी तरी या तांत्रिक सुचनेचा सकारात्मक विचार करून योग्य ते आदेश जारी करावेत अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!