खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २० वर्षीय युवक वारि हनुमान वाननदि डोहात बुडाला

खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील २० वर्षीय युवक वारि हनुमान वाननदि डोहात बुडाला
संग्रामपुर [प्रतिनिधी ] खामगाव अकोला येथील १५ मित्र वारि हनुमान मंदिर व प्रकल्पावर फिरण्यासाठी आले होते दर्शन झाल्यानंतर मंदिर समोरील वान नदीचे पात्रामधील डोहामध्ये मित्रांसह पोहताना बुडाला आहे घटना स्थळी उपस्थित असलेल्यानी दिलेल्या माहिती वरून बुडालेल्या युवकाचे नाव योगेश प्रकाश वानखडे वय 20 वर्ष रा.खुटपुरी ता.खामगाव जि. बुलढाणा असे सांगण्यात येत आहे. तरी सदरचे घटनास्थळ हे बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील असून बुलडाणा जिल्हयातील सोनाळा पोस्टे व अकोला जिल्हयातील हिवरखेड पोलीस स्टेशन येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. झालेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह जास्त असल्याने बुडालेल्या युवकाचा शोध सुरू आहे असल्याची माहिती सोनाळा पोलीसांनी दिली


