क्राईममहाराष्ट्र

नांदेड इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी करुन मोका अंतर्गत कठोर कारवाईची ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (एएसए )च्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री ,गृहमंत्री कडे मांगणी

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] नांदेड येथील इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात (एसआयटी ) स्थापन करावे, व संबंधीत आरोपींवर मोका कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन ( एएसए )च्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि एएसएचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीतसिंग बावरी यांचे पुत्र स्वर्गीय इंद्रजीतसिंग बावरी यांची ८ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील भरदिवसा पेट्रोल पंपाजवळ कथितरित्या हत्या झाली. सदर घटनेमुळे बावरी कुटुंबीयांसह समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला असुन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे हत्या प्रकरणामध्ये पूर्वनियोजित कट, गुन्हेगारी टोळीची भूमिका किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्षपाती पणाने सखोल  उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे एएसएच्या प्रमुख मागण्या या प्रकरणात तातडीने विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करून स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करावी.दोषी आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची कार्यवाही करण्यात यावी दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन युध्दस्तरावर प्रयत्न करावेत.घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध त्यांच्या भूमिकेनुसार BNS मधील कलम 3(5) सह इतर संबंधित कायदेशीर तरतुदींचा वापर करण्यात यावा.इंद्रजीतसिंग बावरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हत्या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर यावे, यासाठी संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी एएसएचे विदर्भ उपाध्यक्ष अनिलसिंग चव्हाण , बुलढाणा जिल्हाध्यक्ष किरणसिंग बावरी , मिथुनसिंग बावरी, राजुसिंग बावरी,गुरुचरणसिंग चव्हाण,असलसीग डांगी,सुरजीतसिंग बाबर,नानकसिंग बावरी,चरणसिग चव्हाण,लाखनसिंग चव्हान ,दयालसिंग चव्हाण ,अवतारसिंग बाबर,रवींद्र सिंग चव्हाण, यशपालसिंग जुनी यांच्या सह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकल सिख सिकलीगर समाज बांधवांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!