पत्रकार शेख अनिस स्मृतीदिना निमित्त वृक्षरोपण विद्यार्थ्यांना लेटर ,वही पेन वितरण


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी पत्रकार शेख अनिस शेख मोहंम्मद यांचे ४ वर्षा पुर्वी अपघात निधन झाले होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ व शिक्षक दिनाचे औचित्य साधुन जि प उर्दु प्राथमिक शाळा वरवट बकाल प्रांगणात शालेय व्यवस्थापन समिती , पत्रकार , शिक्षक , ग्रामस्थाच्या हस्ते वृक्षरोपन करून संगोपन करण्याचा निर्धार उपस्थित मित्र मंडळी शिक्षकांनी केला त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना लेटर , पेन वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार शेख अनिस यांच्या स्मृती दिना निमित्त पत्रकार बांधवानी जुन्या सामाजीक कार्याना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली यावेळी पत्रकार गोपाल इंगळे , अमोल ठाकरे , शेख़ कदिर , साबीर खान, मिर मकसुद अली ,शिवसैनिक प्रल्हाद अस्वार,माजी सरपंच संतोष टाकळकार संतोष ढगे, उर्दू शाळेचे शिक्षक शारीक अहेमद खान , अब्दुल राजीक, पत्रकार शेख़ अनिस यांचे भाऊ शेख़ कारिस शेख़ मोहम्मद, शिक्षण समिति अध्यक्ष शेख़ नाजिम, शेख़ रेहान शेख़ कारिस, शेख़ आरीफ, शेख़ फरिद , शेख़ अयान शेख़ कारिस व विद्यार्थी उपस्थित होते



