सावळ्यातील अल्पभुधारक शेतकऱ्याचा विद्युत तारांचा शॉक लागून मृत्यू

सावळ्यातील अल्पभुधारक शेतकऱ्याचा विद्युत तारांचा शॉक लागून मृत्यू

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सावळा येथील अल्पभुधारक शेतकरी सुभाष जाधव यांचा सावळा शेवगा (शेतखेडा) रसत्यावरुन दुचाकीनी शेतात जात असतांना सदर रसत्यावर झाड विद्युत तारांवर पडल्याने तार अर्धवट लोमलेल्या तारांचा स्पर्श होऊन शॉक लागुन अल्पभुधारक शेतकरी सुभाष जाधव यांचा दुदैवी मृत्यूची घटना घडल्याने संबंधीत शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर पडल्याने सावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
सावळा शेवगा(शेतखेडा) रस्त्यावर झाड विद्युत तारांवर पडल्याने तार अर्धवट लटकलेल्या आणि काही तार रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होत्या. सावळा येथील अडिच शेती असलेले अल्पभुधारक शेतकरी सुभाष जाधव हे शेतात जात असताना विद्युत तारांचा शॉक लागून ४६ वर्षीय शेतकरी सुभाष जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले असुन विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्याचा बळी गेल्याने शेतकरी नागरिकातुन रोष व्यक्त होत आहे.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू कुटुंबाचा आधार हरपल्याने कुटुंबा वर दुःखाच्या डोंगर कोसळला त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. अल्पभुधारक शेतकऱ्याचा दुदैवी मुत्यू मुळे सावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे



