फसविण्याच्या उद्देशाने बनावट नोटा प्रकरणी ४ संश्यीत ताब्यात शेवगा फाटा परिसरात तामगाव पोलीसांची कारवाई

फसविण्याच्या उद्देशाने बनावट नोटा प्रकरणी ४ संश्यीत ताब्यात शेवगा फाटा परिसरात तामगाव पोलीसांची कारवाई
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील शेवगा फाटा येथे तामगाव पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यानपांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन क्र. एमपी ०९ बीएल ४९१० मध्ये ४ संश्यीत बनावट नोटांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आले असल्याची गुप्त माहिती वरुन उपरोकत क्रमाकचे चार चाकी वाहन थांबवुन सदर वाहनातील संश्यीत यांची झडती तपासणी केली असता संशयितांकडे चौकशी केली मात्र संबंधीत संशयित आरोपी कडून समाधानकारक माहिती मिळाली सदर ४ संशयीतां कडून ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तामगाव पोस्टेला संशयीत आरोपी हुसेन अब्बास मिर्झा वय ३५ रा. टुनकी, ता. संग्रामपूर, हरर्जीदर सिंह देवेंद्रसिंह कपूर वय ५० रा. सनावद, जि. खरगोन मध्य प्रदेश, संजय बावरिया सिटोले वय ३२ रा.रमाणा ता. बडवाह, जि. खरगोन मध्य प्रदेश आणि लोकेंद्रसिंह बलवंतसिंह सोलंकी वय ६२ रा. सनावद, जि. खरगोन मध्य प्रदेश या चौघा १९ सप्टेंबर रोजी मध्य रात्री विरुद्ध तामगाव पोलीसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (४), ६२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत थोडक्यात पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी कि १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेवगा फाटा येथे संशयित चारचाकी वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनात ४ व्यक्तींकडे भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या तीन नोटा, तसेच ‘भारतीय बच्चों का बैंक’ असा उल्लेख असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे १६ बंडल आढळून आले. या बनावट नोटांची किंमत ८०० रुपये तसेच वाहनाची अंदाजे किंमत चार लाख रुपये असून, रोख नोटांसह एकूण ४ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल तामगाव पोलीसां करवी जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेला भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (४), ६२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामगाव पोस्टेचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे करित आहे



