जिल्हा वार्ता

अटाळी येथे विद्युत मोटार सोडताना तोल जावुन विहिरीत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

खामगाव [प्रतिनिधी ] तालुक्यातील अटाळी दुष्काळी परिस्थितीमुळे विहिरीतील पाण्याची पातळी खालावली अशा कठीण परिस्थितीत विद्युत मोटार विहिरीत खाली सोडत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने एकनाथ दलपत पातोंड (रा. अटाळी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली.
शेतातील विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने विद्युत मोटार खाली सोडण्याचे काम एकनाथ पातोंड करीत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शेती वाचविण्यासाठी ते प्रयत्नशील असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले. या दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
एकनाथ पातोंड यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबीयांचा आधार हरपला आहे. त्यांच्या जाण्याने अटाळी गावावर शोककळा पसरली दुदैवी घटनेमुळे अटाळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!