आंदोलनजिल्हा वार्ताशिक्षण

पातुर्डा जि प उर्दु शाळेच्या सरक्षण भिंत विविध मांगण्यासाठी युवकांचे संग्रामपुर पं स समोर आमरण उपोषण

पातुर्डा जि प उर्दु शाळेच्या सरक्षण भिंत विविध मांगण्यासाठी युवकांचे पं स समोर आमरण उपोषण

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाची गेल्या २ वर्षा पुर्वी राज्यमहामार्ग रस्ता करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने राज्यमहामार्ग रस्ता व नाली सौदयीकरणा च्या नावाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच्या दिडशे फुट सरंक्षण भिंत जमीन दोस्त करण्यात आली या साठी संबंधीत विभागाने पाठपुरावा करुन विद्यार्थ्याच्या सुरक्षतेच्या दुष्टीकोनातुन शाळेची सरक्षण भिंत बांधुन द्यावे या मांगणी साठी सामाजीक कार्यकर्ते दाऊदशाह व रहेमानोद्दीन काझी यांनी लोकशाही मार्गाने पं स समोर आमरण उपोषण सुरु केले उपोषण दरम्यान शिक्षण विभागाचे कर्मचारी व पातुर्डा ग्रा पं ग्रामविकास अधिकारी धिरज मारोडे यांनी भेट देऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा केली व ८ दिवसात शाळेला तार कंपाउन्ड बांधण्याचे लेखी पत्र दाखवुन उपोषण मागे घेण्याचे सांगीतले परंतु उपोषण कर्ते दाऊद शाह व रहेमानोद्दीन काझी आपल्या दिडशे फुट वॉल कंपाऊन्ड सरक्षण भिंत बांधकाम या मांगणी वर ठाम असल्याने उपोषण सुरुच ठेवले
पातुर्डा जि प उच्च प्रा शाळा १ ते ७ पर्यंत असुन विद्यार्थी पट संख्या २९० आहेत ७ शिक्षक कार्यरत आहेत ३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत गेल्या २ वर्षा पुर्वी राज्यमहामार्ग रस्ता करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने राज्यमहामार्ग रस्ता व नाली सौदयीकरणा च्या नावाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच्या दिडशे फुट सरंक्षण भिंत जमीन दोस्त करण्यात आली रस्ता वर्दळीचा असल्याने व मुख्य रस्ता असल्याने नेहमी वाहनाची वाहतुक सुरु असते सरंक्षण भिंत व ब्रेकर विना असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यां असुक्षित असुन जिवाला धोका शाळेत ये जा करतांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड पालक ग्रामस्था कडून होत असुन याकडे संबंधीत विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन पातुर्डा जि प उच्च प्रा शाळेतील रिक्त पदे , शाळा परिसरात ब्रेकर बसविण्यात यावे व सरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपल्बध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मांगणी उपोषण कर्ते सामाजीक कार्यकर्ते दाऊद शाह , रहेमानोद्दीन काझी यांनी केली आहे उपोषण मंडपाला वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकारी शालेय शिक्षण समिती ,पातुर्डा ग्रामस्थ , युवकांनी भेट देऊन पाठींबा दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!