जिल्हा वार्तामहाराष्ट्र

जिल्हा बँकेसाठी तारणहार ठरलेले सीईओ डॉ.अशोकराव खरात यांना मुदतवाढ

बुलडाणा :- जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ अशोकराव खरात यांच् नियोजन व अथक प्रयत्नातून डबघाईस आलेली जिल्हा केंद्रीय सहकारी बँक पूर्व पदावर येत आहे.बँकेला गत वैभव प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्याधिकारी डॉ. अशोकराव खरात यांना शासना कडून मुख्याधिकारी पदी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.2028 पर्यंत ते आता बँकेचा कारभार पाहतील.ही बँकेसाठी आणि शेतकरी वर्गासाठी शुभवार्ता मानली जाते.

जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही तळागाळातील आणि गोरगरीब व शेतकरी वर्गाला पतपुरवठा करणारी बँक मानली जाते. मधल्या काळात बँक डबघाईस आल्याने बँकेचे व्यवहार देखील ठप्प झाले होते. बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना अथक प्रयत्न व योग्य नियोजन करून डॉक्टर अशोकराव खरात यांनी बँक पूर्व पदावर आणण्याचे मोठे प्रयत्न सुरू ठेवले. त्याला चांगले यश आले आहे. जिल्हा केंद्रीय सहकारी बँक पुन्हा नव्याने उभारी घेत आहे.बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आले आहे. याची दखल घेत रिझर्व बँकेने त्यांना 31 मार्च 2028 पर्यंत मुदत वाढीस मंजुरात दिली आहे. त्यांना मुदत वाढ दिल्या बद्दल जिल्हा बँकेचे कर्मचारी,सहकार क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!