क्राईम

लोणार पोलीसांची तीन रेती वाहणावर कारवाई..४ लाख ३२ हजार रु. दंड आकारला..!

लोणार  प्रतिनिधी :- लोणार -मराठवाडयातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून लोणार मार्गे अवैध्यरित्या रेती वाहतूक सुरु असल्याची गुप्त माहिती ठाणेदार निमिष मेहत्रे यांना मिळाली. पीएसआय राजाभाऊ घोगरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह साफळा रचून तीन टिप्पर कारवाईसाठी ताब्यात घेतल्याची घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी लोणी नाक्यावर मध्यरात्री दरम्यान घडल्याने.एकच खळबळ उडाली.
सदर तिन्ही टिप्पर हे दंडात्मक कारवाई साठी पोलीस स्टेशन आवारात लावून तहसीलदार यांना दंड आकारनी करण्याचे पत्र देऊन. टिप्पर क्र.एम. एच. बी.जी. ७६९३ मालक दिलीपसिग रमेशसिंग गहिलाते रा. तळणी ता. मंठा. जी जालना, टिप्पर क्र.एम. एच. २१बी. एच.७१२३ मालक अमोल भीमराव जायभाये रा. टाकळखोपा ता. मंठा जी. जालना व टिप्पर क्र.एम. एच. २१बी. एस. ४७९३ मालक निलेश बाळासाहेब राऊत रा. तळणी ता. मंठा जी. जालना यांच्या तिन्ही वाहणावर अवैध्यरित्या वाहतूक केल्या प्रकरणी पोलीसानी दिलेल्या पत्रा वरून तहसीलदार भूषण पाटील यांनी प्रत्येकी १ लाख ४४ हजार रुपये प्रमाणे ४ लाख ३२ हजार रुपये अशा दंड आकरण्यात आल्याची माहिती पिएसआय राजाभाऊ घोगरे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!