अमली पदार्थ व सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी देऊळगाव राजा येथे जनजागृती पथनाट्य
पोलीस व न्यायालयाचा संयुक्त उपक्रम – ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत प्रभावी संदेश

देऊळगाव राजा (प्रतिनिधी) : मा. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश ताबे. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या उपस्थितीत देऊळगाव राजा येथे आज (दि. १३) सकाळी १० वाजता बसस्थानक परिसरात अमली पदार्थ विरोधी व सायबर जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.हा उपक्रम बुलडाणा जिल्हा पोलीस दल, देऊळगाव राजा पोलीस स्टेशन, तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन परिवर्तन’ या राज्यस्तरीय मोहिमेअंतर्गत राबविण्यात आला.पथनाट्याच्या माध्यमातून युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, अमली पदार्थांचा वापर, तसेच सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर सावधगिरी बाळगण्याचा, ऑनलाईन
फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला.सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० व १५५४५, तसेच संकेतस्थळ www.cybercrime.gov.in याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक, न्यायालयीन अधिकारी, वकील, शिक्षक, विद्यार्थी, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.दुपारी २ वाजता बालाजी फरसावर परिसरात दुसऱ्या सत्रातही पथनाट्य सादर करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले कीदेऊळगाव राजा हा शिक्षणासाठी प्रसिद्ध तालुका आहे. परंतु काही तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. या मोहिमेद्वारे आपण तरुणाईला योग्य दिशा देऊन समाज आणि देश प्रगतीपथावर नेऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.या उपक्रमातून तरुणांनाह नशामुक्त, सायबर-जागरूक आणि जबाबदार नागरिक होण्याचा प्रभावी संदेश देण्यात आहे


