सहेली सिंपोजियम व पास्ट प्रेसिडेंट फोरम कार्यक्रम उत्साहात संपन्न
जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीचा पुढाकार

देऊळगाव राजा प्रतिनिधी :- जायंटस वेलफेअर फाउंडेशन दोन ब च्या अंतर्गत येणाऱ्या जायंटस ग्रुप ऑफ वैजापूर सहेलीच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर २५ रोजी वैजापूर येथे महिलासाठी सहेलि सिंपोजियम व सर्व ग्रुपच्या आजी-माजी अध्यक्षासाठी पास्ट प्रेसिडेंट फोरम मीटिंगचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वनश्री मध्ये आयोजित करण्यात आले होते या दोन्ही कार्यक्रमासाठी स्पेशल कमिटी सदस्य सूर्यमालाताई मालानी, विनोद शेवतेकर,
फेडरेशन दोन ब चे अध्यक्ष प्रा. गुरुदत्त राजपूत ,सचिव सौ रंजना भावसार, उपाध्यक्ष रत्नाकर महाजन, व जुगल किशोर हरकुट, कोषाध्यक्ष सुमित गुप्ता (नांदगांव)फेडरेशन डायरेक्टर संतोषी भालेराव युनिट ऑफिसर अनघा आंबेकर वैजापूर सहेलीच्या अध्यक्ष रत्नमाला कुलकर्णी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर असे की जायंटस वेलफेअर फाउंडेशन ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना आहे या संघटनेचे भारतात फार मोठे नेटवर्क असून आपत्ती व्यवस्थापनामध्ये ठीक ठिकाणी योगदान आहे संस्थापक अध्यक्ष मुंबई शेरीफ नाना चुडासामा नंतर आता त्यांची कन्या शायना एन.सी. ह्या या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे या संघटनेत जे जे ग्रुप आहेत त्यांची वेगवेगळी विभागणी करण्यात आलेली आहे फेडरेशन दोन ब मध्ये एकूण 42 ग्रुपचा समावेश आहे या 42 ग्रुप मध्ये 1000 चे वर सदस्य आहेत यामध्ये महिलांचे सुद्धा स्वतंत्र ग्रुप कार्यरत आहेत सोबतच यंग जायंटस सुद्धा ग्रुप आहेत सामाजिक क्षेत्रात काम करताना सदस्यांचा उत्साह वाढवा त्यांना नवनवीन विषयाची माहिती व्हावी त्यासाठी दरवर्षी सहेली सिंपोजियम व पास्ट प्रेसिडेंट फोरम मीटिंग चे आयोजन वेगवेगळ्या ग्रुपच्या वतीने करण्यात येते यावर्षी वैजापूर सहलीने पुढाकार घेतला व फेडरेशनच्या माजी अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी यांचे
मार्गदर्शनाखाली दोन्ही कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अनन्या आंबेकर, काया वर्मा, व कनिका वर्मा यांनी सादर केलेल्या नृत्य अविष्काराने सर्वांचे मन वेधून घेतले याच बरोबर वैजापूर शहराच्या वैभवात शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्था चालकाचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला तर सतत 27 वर्षे जायंटस सहेली साठी अविरत कार्य करणाऱ्या अंजली जोशी यांचा ग्रुपच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात ग्रूप च्या ज्येष्ठ सदस्य संध्या ठोंबरे, मंदा तांबे, इंदुमती साठे, अलका साखरे, विद्या वाडेकर, विद्या चापनेरकर, सुरेखा धुमाळ, संगीता भालेराव, कांचन साखरे, अरुणा साखरे, भक्ती जाधव, योगिता साखरे, वैशाली साखरे, अंजली कंगले, मीना दाभाडे, कमल हरदास, टेके ताई, या सर्व सहेलिंचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोषी भालेराव अनघा आंबेकर रत्नमाला कुलकर्णी व त्यांच्या अधिनस्त सर्व महिला सदस्यांनी अथक परिश्रम घेतले प्रास्ताविक रत्नमाला कुलकर्णी तर आभार विद्या सापानेरकर यांनी मांडले.



