पातुडर्यात एका वरली जुगाऱ्या विरूध्द स्थानीक गुन्हा शाखाची कारवाई
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील एका किराणा व पानसेन्टर जवळ जुगाऱ्या जवळ वरलीचे आकडे लिहिलेले चिट्या व साहित्य स्थानीक गुन्हे शाखा पोलीसांना मिळून आल्याने एका आरोपी विरुध्द तामगाव पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे गुप्त माहिती वरुन स्थानीक गुन्हा शाखा बुलडाणा पोलीसांनी दि २७ ऑक्टोंबर रोजी पातुर्डा येथील पान सेंन्टरवर जुगार रेड केली असता आरोपी राजपाल साहेबराव वानखडे हा वरली मटका जुगाराचे आकडे लिहलेली एक कार्बन चीठ्ठी ३ पेन असा एकुण १३२० रुपायाचा जुगार मुद्देमाल मिळून आला फिर्यार्दी अजीस परसुवाले यांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या लेखी रिपोर्ट वरुन आरोपी राजपाल वानखडे याच्या विरुध्द सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पातुर्डा बीट जमादार प्रमोद मुळे करित आहे



