क्राईमजिल्हा वार्ता
शेतकरी महिलेचा विनयभंग जातीवाचक शिवीगाळ १ आरोपी विरुद्ध अट्रासिटी सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील एका गावात शेतकरी महिला पती सह शेतात काम करित असतांना वाईट उद्देशाने महिले हात पकडून जवळ ओढून कवट्यात पकडून विनयभंग केला तसेच जातीवाचक शिवीगाळ करून चापट बुक्याने मारहान करित सोयाबीन तुर पिकाचे नुकसान केले सदर महिलेने तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यार्दी वरुन आरोपी विजय बोंडे रा डाबकी रोड अकोला याच्या विरूद्ध कलम 74,75,76,115(2),296,324 (4),351 (2) (3), भा.न्या. सं 2023 सहकलम 3(2) (va), 3 (1) (r), 3(1)(s), 3(1)(w)(i), 3 (1) (w) (ii), अनुसुचीत जाती जमाती अंत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारणा २०१५ दाखल करुन गुन्हयाचा तपास आनंद महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर करित आहे



