समाजाचा पैसा पाखंड बुवाबाजीवर उधळू नका ! हरिभक्त परायण संभाजी शिर्के

संग्रामपुर [प्रतिनिधी ] अंधश्रद्धा पाखंड व बुवाबाजी वर चौफेर टीका केली. माता भगिनींनी समाजातील साधू ओळखले पाहिजे यासाठी त्यांनी संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला दिला .
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा
संत गाडगेबाबांनी समाजाची पीडा समजली एक मोळीदिली. त्या बदली भाकरी मागितली व पूर्ण गाव झाडून स्वच्छ करून दिले. पंजाबराव देशमुख यांनी राब राब राबून संस्था उभ्या केल्या. शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी उघडी केली. या महापुरुषांनी मोबदल्यात एक रुपयाची अपेक्षा केली नाही. समाजातील असे साधू ओळखले पाहिजे. समाजाच्या वर्गणीतून येणारा पैसा पूर्णता जनकल्याणासाठी आणि समाज कल्याण साठी वापरला गेला पाहिजे. बुवाबाजी व पाखंड मिरवणाऱ्यांवर समाजाच्या पैशाची उधळपट्टी करू नका. अशा शब्दात पातुर्डा येथील हरिनाम संकीर्तन सप्ताह दरम्यान बोलताना हरिभक्त परायण संभाजी शिर्के यांनी प्रहार केला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .वारकऱ्यांचा फार मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे असे असताना आम्ही यूपी बिहार आणि मध्य प्रदेशातून महाराज आमंत्रित करायला लागलो. आमच्या संस्कृतीमध्ये काय खोट आहे ?आमच्या संतांनी दिलेली शिकवण इतरांकडून काय ऐकायची? कमाई करताना इमानदारीने कमाई करा मेहनतीच्या स्वरूपात पगारातून येणारी रक्कम ही लक्ष्मी असते . हरामाच्या माध्यमातून आलेली कमाई ही अवदासा असते, हे समजले पाहिजे. आज आपण अनेक सरकारी कार्यालयात पाहतो चिरीमिरी शिवाय काम होत नाहीत .पण अशा चिरीमिरी करणाऱ्यांकडे जरा बारकाईने पहा . ते लोक सुखी नाहीत. यांच्याकडे पैसा आहे पण सुख नाही .आज बुवाबाजीकडे जाणारे हेच लोक आहेत. यातील फार मोठा वर्ग आपल्या घरातील अडचणी घेऊन परत त्याच बुवाबाजीकडे जातो आणि हरामातली कमाई हरामातच जाते . जशी आपण कमाई करतो तशी ती कमाई जाते यावर विश्वास ठेवा आणि मुला बाळांना कष्टाचे पैसे खाऊ घाला असा सल्लाही त्यांनी दिला.
माय बापाने मुलांना संस्कार दिले पाहिजे आधी केले मग सांगितले या तत्त्वाने आपण वागले पाहिजे मुलं अनुकरण करत असतात. आईबाप याप्रमाणे वागतात त्यांच्या पावलावर पाऊल मुलं टाकत असतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असा दाखला देऊन त्यांनी आपले मत पटवून दिले. आज समाज बदलला. समाजाला महिला स्वतंत्र पाहिजे .पण , स्वतंत्रता आणि स्वच्छंदता यामध्ये खूप फरक आहे स्वतंत्रता निश्चितच असली पाहिजे पण कमी कपडे , ओढणी न घेणे मनात वाटेल तसे वागणे ह्या गोष्टी बरोबर नाहीत .हा स्वच्छंदीपणा समाजाला अधोगतीकडे नेत आहे समाजाच्या विरोधात जगू नका. वेळ गेल्यावर पश्चाताप येतो मग तुम्ही चुका निस्तरू शकत नाही.
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे तो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
समाजात असे अनेक लोक आहेत अनेक संघटना आहेत ज्या अनाथांसाठी नाथ बनतात. कोकलवाडी येथील मठात अशाच प्रकारची एक संस्था आम्ही चालवतो. या ठिकाणी आठ अनाथ बालक यांना सेमी इंग्लिश मध्ये एक चांगले दर्जेदार शिक्षण देण्यात येते आम्ही देतो . अनाथ मुले असतील तर त्यांना आमच्याकडे सोपा या मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसाठी ते सुद्धा मोकळ्या हाताने द्या . सत्संगाची कास धरा.टाळकरांची अप्रतिम साथ
राधाकृष्ण पंच मंडळाच्या टाळकरी बांधवांचे यावेळी संभाजी शिर्के महाराजांनी तोंड भरून कौतुक केले . अशा प्रकारची संतती असेल तर देवाला सुद्धा याचा अभिमान वाटेल असे सांगताना त्यांनी या टाळकरांच्या आई-वडिलांचे कौतुक केलं.
जोडूनिया धन उत्तम व्यवहारे असा दाखला देत महाराज समाजातील उत्तम कमाईचे कमाई कडे भर देतात. मला दहा मुले आहेत हे दहा मुले कीर्तनकार होतील पण ती कीर्तनाच्या भरोशावर पोट भरणारी पिढी होणार नाही . अशा शब्दात महाराजांनी युवक माता पिता व सर्वांना संबोधित केले.



